भाजपला बहुमत सिद्ध करणे केवळ अशक्य – सिद्धरामय्या

नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपकडे पूर्ण बहुमत नसताना देखील राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावल्याने काँग्रेसने या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने भाजपला आज ४ वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान आज बी. एस. येडियुरप्पा विश्वास दर्शक ठरावाला समोर जाणार आहेत.त्यांच्यापुढे बहुमत सिद्ध करण्याच मोठ आव्हान असणार आहे.

दरम्यान काँग्रेसचे सर्व आमदार आमच्यासमवेत असून एकही जण फुटलेला नाही असा दावा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. भाजपकडे केवळ १०४ आमदार आहेत. तर आमच्याकडे 116 आमदार आहेत. आमचे सर्व आमदार आमच्या संपर्कात असून, कोणीही बंडखोरी करणार नाही. त्यामुळे भाजपला हा विश्वासदर्शक ठराव जिंकणे केवळ अशक्य असल्याचं त्यांनी म्हंटलं तसेच त्यांनी यावेळी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं म्हंटलं आहे.Loading…
Loading...