कोण असणार कर्नाटकचा मुख्यमंत्री?; आज होणार फैसला

blank

नवी दिल्ली – कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

दरम्यान भाजपकडे पूर्ण बहुमत नसताना देखील राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावल्याने काँग्रेसने या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने भाजपला आज ४ वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. विराजपेठ येथील भाजपा आमदार के.जी.बोपय्या यांची कर्नाटक विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज होणाऱ्या महत्वपूर्ण विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी बोपय्या विधानसभेचे अध्यक्ष असतील.

भाजपकडे एकूण आमदारांची संख्या आहे १०४ त्यांना बहुमतासाठी ८ आमदारांची आवश्यकता आहे. दरम्यान काँग्रेसने या आधीच जेडीएसला पाठींबा दिल्याने काँग्रेस जेडीएस आघाडीचे ११६ आमदार होतायेत याच आधारावर क काँग्रेसने कर्नाटकात सत्ता स्थापनेचा दावा केला होता दरम्यान. आज होणारा विश्वासदर्शक ठराव कोण जिंकणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.