fbpx

येडियुरप्पा एकच दिवस मुख्यमंत्री पदावर राहतील – कॉंग्रेस

बंगळुरू – कर्नाटक मध्ये सत्तासंघर्ष आता टोकाला पोहचला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे. सुप्रीम कोर्टात रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर काल सकाळी 9 वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

दरम्यान सुप्रीम कोर्टाने कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश आज दिले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे काँग्रेसने स्वागत केले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला म्हणाले, अखेर संविधानाचा विजय झाला असून लोकशाही वाचली. येडियुरप्पा आता एक दिवसाचेच मुख्यमंत्री ठरतील. कर्नाटकच्या राज्यपालांचा संविधानविरोधी निर्णय हायकोर्टाने फेटाळला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

1 Comment

Click here to post a comment