Karnataka Election : कल दुध का दुध और पाणी का पाणी हो जायेगा -अभिषेक मनु सिंघवी

बंगळुरू : कर्नाटक मध्ये सत्तासंघर्ष आता टोकाला पोहचला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.सुप्रीम कोर्टात रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर काल सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

दरम्यान भाजपकडे बहुमत नसून देखील त्यांना राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी बोलावल्याने या निर्णयावर कॉंग्रेसने सुप्रीम कोर्टाकडे दाद मागितली होती. दरम्यान आज झालेल्या सुनावणीत कर्नाटक विधानसभेत शनिवारी संध्याकाळी चार वाजता बहुमत सिद्ध करावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने सत्ताधारी भाज पाला दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर कल दुध का दुध और पाणी का पाणी हो जायेगा अशा शब्दात काँग्रेस प्रवक्ता अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली आहे. या खटल्यात त्यांनी काँग्रेसची बाजू मांडली होती.