Karnataka Election; भाजपची जोरदार मुसंडी

बंगळूरू – कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी १२ मेला मतदान झालं होतं. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीला २०१९ साली होणाऱ्या लोकसभेच्या दृष्टीकोनातून महत्व प्राप्त झाल्याने. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

दरम्यान कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळी ८ वाजता कर्नाटकातील ४० मतदान केंद्रांवर या मतमोजणीला सुरुवात झाली. २२४ पैकी २२२ जागांसाठी १२ मे रोजी येथे मतदान झाले होते. त्यांपैकी आर. आर. नगर येथील गैरप्रकार तर जयनगर मतदारसंघात भाजप उमेदवाराचे निधन झाल्याने या दोन जागांवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने जोरदार मुसंडी मारत आघाडी घेतलीये तर काँग्रेस मात्र पिछाडीवर आहे. बेल्लारी शहर मतदारसंघातून जी.सोमशेखर रेड्डी आघाडीवर आहेत,तर चांमुडेश्वरी मतदारसंघातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या पिछाडीवर असून भाजप या ठिकाणी आघाडी घेताना दिसून येत आहे. बदामी मतदारसंघातून मात्र भाजपाचे श्रीरामलू पिछाडीवर असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी आघाडी घेतलीये. तर रामनगरमधून जेडीसएसचे कुमारस्वामी आघाडीवर आहेत.

You might also like
Comments
Loading...