अखेर कुमारस्वामींनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

बंगळुरु : भाजप नेते येडियुरप्पा यांनी 19 मे रोजी बहुमत सिद्ध न करता आल्याने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तर दुसरीकडे कॉंग्रेसने जेडीएसने पाठींबा देत बहुमताचा दावा केला होता.

अखेर आज जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा सुरवातीला फेटाळून लावणाऱ्या राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

दरम्यान आज झालेल्या शपथग्रहण सोहळ्यात कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाची तर काँग्रेसनेते जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आज रंगलेल्या शपथग्रहणाच्या या शाही सोहळ्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी , सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मायावती यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.