कुमारस्वामींवर शुभेच्छांचा वर्षाव; राहुल, सोनिया गांधींसह ‘या’ नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : सकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने बीएस येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीआधीच काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बहुमत सिद्ध करण्यासाठी १११ आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता. पण भाजपाकडे १०४ आमदार होते. बहुमतासाठी बरेच प्रयत्न करुनही सात आमदारांचा पाठिंबा जमवणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर येडियुरप्पांनी बहुमत चाचणीलासामोरे जाण्याआधी राजीनामा दिला.

बीएस येडियुरप्पा  यांनी राजीनामा दिल्यानंतर आता कॉंग्रेसने पाठींबा दिलेले कुमारस्वामी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. येत्या बुधवारी ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यांना  बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी १५ दिवसांची मुदत दिली आहे.

दरम्यान कुमारस्वामींनवर शुभेच्छांचा  वर्षाव होतं असून, देशभरातील प्रमुख नेत्यांनी त्यांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, तेलंगणचे मुख्यमंत्री के.सी.राव यांनी फोन करुन त्यांना  शुभेच्छा दिल्या.