Karnataka Election : काँग्रेसचे ते दोन आमदार सापडले

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपकडे पूर्ण बहुमत नसताना देखील राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावल्याने काँग्रेसने या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने भाजपला आज ४ वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान आज बी. एस. येडियुरप्पा विश्वास दर्शक ठरावाला समोर जाणार आहेत.त्यांच्यापुढे बहुमत सिद्ध करण्याच मोठ आव्हान असणार आहे.

दरम्यान अशा परिस्थितीत घोडेबाजार होण्याची दाट शक्यता असून, कॉंग्रेसचे ते दोन बेपत्ता असलेले  आमदार सापडल्याची माहिती हाती येतीये. प्रताप गौडा आणि आनंद सिंह असं त्या आमदारांच नाव आहे. हे दोघे आमदारांच्या शपथविधीसाठी विधिमंडळात उशिरापर्यंत पोहचू शकले नव्हते त्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण होते. दरम्यान  ते आमदार सापडल्याचे वृत्त आहे. कर्नाटकमधील त्रिशंकु विधानसभेत आज मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करायचे आहे.