fbpx

आमदारांनो आधी पैसे घ्या आणि नंतरच भाजपला पाठींबा द्या –  संजय राऊत  

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपकडे पूर्ण बहुमत नसताना देखील राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावल्याने काँग्रेसने या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने भाजपला आज ४ वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.  आज बी. एस. येडियुरप्पा विश्वास दर्शक ठरावाला समोर जाणार आहेत. त्यांच्यापुढे बहुमत सिद्ध करण्याचं मोठ आव्हान असणार आहे.

मात्र भाजपकडे बहुमत नसताना देखील राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी बोलवल्याने विरोधकांसह भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने देखील भाजपवर टीकेची झोड उठ्वलीये. आज भाजप कर्नाटकमध्ये बहुमत सिद्ध करणार आहे. मात्र भाजपकडे १०४ आमदार असून, त्यांना बहुमतासाठी आणखी ८ आमदारांची आवश्यकता आहे. त्यामुळे कर्नाटकात घोडेबाजार होण्याची  शक्यता आहे.

यावरून शिवसेना येते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय. आमचे अजून १५ लाख रुपये येणे बाकी आहे . त्यामुळे जे आमदार भाजपला  पाठिंबा  देणार आहेत त्यांनी आधी पैसे घ्यावेत आणि नंतरचं पाठिंबा  द्यावा अशी  टीका त्यांनी केलीये. यापूर्वी देखील राज्यपाल  वजुभाई वाला  यांनी लोकशाहीची हत्या केल्याची टीका त्यांनी केली होती.

1 Comment

Click here to post a comment