fbpx

Karnataka Election: सिद्धरामय्या यांच्या मुलाचा ४१ हजार मतांनी विजय

कर्नाटक – कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजप स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत आहे. भाजप १०६ कॉंग्रेस ७३ तर जेडीएस ३८ जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीकडे लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहण्यात येत असल्याने दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.

दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासाठी कर्नाटकरांचा कौल धक्कादायक राहिला. सिध्दरामय्या यांचा बदामीत विजय झाला असला तरी चामुंडेश्वरीमधून त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.त्यांनी मुलगा यतींद्र याच्यासाठी आपला पारंपारिक मतदार संघ वारुणा सोडला होता आणि चामुंडेश्वरीतून निवडणूक लढवली. या मतदारसंघातून त्यांचा मुलगा यतींद्र यांचा ४१ हजार मतांनी विजय झालाय. दरम्यान बदामीत जरी सिद्धरामय्या यांचा विजय झाला असला तरी देखील त्यांना चामुंडेश्वरीत पराभवाचा धक्का बसलाय.

2 Comments

Click here to post a comment