Karnataka Election; भाजप सत्ता स्थापनेच्या जवळ; काँग्रेसला जोरदार धक्का

bjp wins karnataka

बंगळूरू – कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी १२ मेला मतदान झालं होतं. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीला २०१९ साली होणाऱ्या लोकसभेच्या दृष्टीकोनातून महत्व प्राप्त झाल्याने. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

दरम्यान कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून . सकाळी ८ वाजेपासून कर्नाटकातील ४० मतदान केंद्रांवर या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजप सत्ता स्थापनेच्या जवळ असून, कर्नाटकमध्ये भाजपचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. कर्नाटकमध्ये भाजप ११० जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ६२, जेडीएस ४८, अपक्ष २ जागांवर आघाडीवर आहे.

बहुमतासाठी ११२ जागांची आवश्यकता आहे दरम्यान आतापर्यँत हाती आलेल्या निकालानुसार भाजप बहुमतापासून केवळ २ जागा दूर आहे. तर जेडीएस देखील ४८ जागांवर आघाडी घेऊन जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे. एकूणच कर्नाटक निवडणुकीतून प्राप्त होणारे निकाल काँग्रेस आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासाठी धक्कादायक अशा स्वरूपाचे आहेत.Loading…
Loading...