fbpx

Karnataka Election; पायरीवर नतमस्तक होत येडियुरप्पांनी केला विधानसभेत प्रवेश

नवी दिल्ली – कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर आज सकाळी ९ वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.

सुप्रीम कोर्टात मध्यरात्री दोन ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

दरम्यान शपथग्रहण सोहळ्यानंतर येडियुरप्पा हे विधानसभा परिसरात पोहोचले. केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्यासह पक्षाचे अनेक नेते त्यांच्याबरोबर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या पद्धतीने २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर संसदेच्या पायरीसमोर नतमस्तक होऊन प्रवेश केला होता. अगदी तसेच येडियुरप्पा हेही विधानसभेच्या पायरीसमोर नतमस्तक झाले आणि विधानसभेत प्रवेश केला.

भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी गुरूवारी सकाळी ९ वाजता राजभवनात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. कडक सुरक्षा व्यवस्थेत हा शपथविधी पार पडला. येडियुरप्पांनी कन्नडमध्ये शपथ घेतली. त्यांनी तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा घेतली आहे. सध्या त्यांनी एकट्यानेच शपथ घेतली असून बहुमत सिद्ध केल्यानंतर इतर मंत्र्यांना शपथ दिली जाईल.

तत्पूर्वी राजभवनात शपथविधीला जाण्यापूर्वी येडियुरप्पांनी राधा-कृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले. राजभवनात पोहोचताच त्यांनी भाजपा नेते आणि राज्याचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांबरोबर चर्चा केली. राजभवनाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.कडेकोट बंदोबस्तात त्यांना आज मुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली.