‘ती’ कथित ऑडियो सीडी फेक; कर्नाटकात कॉंग्रेसकडून डर्टी ट्रीक्सचा वापर – जावडेकर

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपकडे पूर्ण बहुमत नसताना देखील राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावल्याने काँग्रेसने या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने भाजपला आज ४ वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान आज बी. एस. येडियुरप्पा विश्वास दर्शक ठरावाला समोर जाणार आहेत.

मात्र त्यापूर्वी कॉंग्रेसकडून एक ऑडियो क्लिप जारी करण्यात आली आहे. या ऑडियो क्लिपच्या आधारे भाजप आमच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. भाजपा नेते जर्नादन रेड्डी यांनी काँग्रेसच्या एका आमदाराला लाच देऊन विकत घेण्याचा प्रयत्न केला. हा आरोप सिद्ध करण्यासाठीच ही सीडी जारी करण्यात आली आहे.

दरम्यान भाजप नेते केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मात्र काँग्रेसचे सगळे आरोप फेटाळले आहेत. काँग्रेस कर्नाटकात डर्टी ट्रीक्स वापरत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. तसेच ही कथित ऑडियो सीडी फेक असून, त्यामध्ये तथ्य नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...