Karnataka Election ; कॉंग्रेसचा मास्टरस्ट्रोक, कुमारस्वामी होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागांवर विजय मिळाला असला तरी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी काँग्रेसने खेळली आहे. काँग्रेसने देवेगौडा यांच्या जनता दल सेक्यूलर पक्षाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली असून देवेगौडा यांचे चिरंजीव कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देखील दिल्याचे वृत्त आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा सुरूवातीला ११३ जागांनी आघाडीवर होती. पण अचानक बहुमताचा आकडा ११२ च्या खाली भाजपाची संख्या गेली, तो त्यामुळे भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आणखी ६ आमदारांची कमतरता भासत आहे. यात ३ अपक्ष निवडून आले आहेत, तर जेडीएस आणि काँग्रेस यांचा आकडा मिळून बहुमताचा आकडा पार होवू शकतो, यामुळे काँग्रेसने सत्ता स्थापण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

जेडीएसने काँग्रेससोबत सत्ता स्थापन करावी म्हणून, बंगालमधून ममता बॅनर्जी, आंध्रमधून चंद्राबाबू नायडू यांनी जेडीएसचे एचडी दैवेगौडा यांच्याशी फोनवर चर्चा करण्यास सुरूवात केली आहे. एकंदरीत जोपर्यंत भाजप कर्नाटकात सत्तेच्या जवळ होता, तोपर्यंत विरोधकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

2 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...