Karnataka Election; आकड्यांच्या या खेळामुळे भाजप राहणार सत्तेपासून दूर?

टीम महाराष्ट्र देशा – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागांवर विजय मिळाला असला तरी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी काँग्रेसने खेळली आहे. काँग्रेसने देवेगौडा यांच्या जनता दल सेक्यूलर पक्षाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली असून देवेगौडा यांचे चिरंजीव कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देखील दिल्याचे वृत्त आहे.

सध्याची एकूण स्थिती पाहता कॉंग्रेस आणि जनता दल सेक्यूलर यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर बनला आहे. भाजप सध्या १०६ जागांवर आघाडीवर आहे. त्यांना बहुमतासाठी आणखी ६ जागांची आवश्यकता आहे. तर काँग्रेस ७३ आणि जेडीएस ४१ यांची आघाडी झाल्याने त्यांना बहुमताचा आकडा गाठणे सहज शक्य होणार आहे. दरम्यान अशा परिस्थितीत भाजप जरी कर्नाटकात सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी देखील त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागेल

Loading...

दरम्यान जेडीएसने काँग्रेससोबत सत्ता स्थापन करावी म्हणून, बंगालमधून ममता बॅनर्जी, आंध्रमधून चंद्राबाबू नायडू यांनी जेडीएसचे एचडी दैवेगौडा यांच्याशी फोनवर चर्चा करण्यास सुरूवात केली आहे. एकंदरीत जोपर्यंत भाजप कर्नाटकात सत्तेच्या जवळ होता, तोपर्यंत विरोधकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राजमुद्रेचा वापर केला तर कायदेशीर लढाई लढणार : विनोद पाटील