कर्नाटक विधानसभा : कोणाला पाठींबा द्यायचा ते निकालानंतर ठरवू – एच. डी. देवेगौडा

बंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान झाले असून निकाला अद्याप दोन दिवस बाकी आहेत. मात्र अनेक एक्झिट पोल्समधून कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचं चित्र पुढे आलं आहे. कर्नाटक विधासभा निवडणुकीचे कौल त्रिशंकू लागणार असल्याचं जवळपास निच्छित झाले आहे. त्यामुळे जनता दल सेक्युलर किंगमेकर ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यानंतर पक्षाचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी निकालानंतरच्या भूमिकेबद्दल महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ‘सध्या कोणतीही ऑफर स्वीकारण्याची किंवा नाकारण्याच्या स्थितीत नाही. 15 मे रोजी मतमोजणी सुरू झाल्यावर काय होतं ते पाहू,’ असं देवेगौडा यांनी म्हटलं आहे.दरम्यान देवेगौडा हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा आहे.

जनता दल सेक्युलर कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही, अशी भूमिका याआधी देवगौडा यांनी घेतली होती. मात्र शनिवारी आलेल्या एक्झिट पोल्सनंतर त्यांच्या या भूमिकेत मोठा बदल झाला आहे. काँग्रेस आणि भाजपला मिळणाऱ्या जागांमधील अंतर अतिशय कमी असेल. त्यामुळे जनता दल सेक्युलर किंगमेकर होईल, असं बहुतांश एक्झिट पोल्सच्या आकडेवारीतून समोर येत आहे. त्यामुळेच देवगौडा यांनी, सध्या कोणताही प्रस्ताव स्वीकारण्याच्या किंवा नाकारण्याच्या स्थितीत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

You might also like
Comments
Loading...