Karnataka Election : निवडणुकीत १० हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च

बंगळूरू – कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी १२ मेला मतदान झालं होतं. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीला २०१९ साली होणाऱ्या लोकसभेच्या दृष्टीकोनातून महत्व प्राप्त झाल्याने. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.

या निवडणुकीदरम्यान दोन्ही पक्षांचे दिग्ग्ज नेते कर्नाटकमध्ये तळ ठोकून होते. भाजपकडून नरेंद्र मोदी , अमित शहा तर काँग्रेसकडून राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी राज्यात अनेक प्रचारसभा घेतल्या होत्या. दोन्ही पक्षांकडून निवडणुकीसाठी प्रभावी कॅम्पियन करण्यात आलं होतं. यासाठी प्रचंड पैसा दोन्ही पक्षांकडून खर्च करण्यात आला.पैशांच्या अनुषंगाने कर्नाटक विधानसभेची गेल्या आठवडय़ात झालेली निवडणूक देशातील विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात खर्चीक ठरली आहे, असे ‘सेंटर ऑफ मीडिया स्टडीज’ या संघटनेने केलेल्या पाहणीत आढळले आहे.

कर्नाटकमध्ये पार पडलेली निवडणूक प्रक्रिया म्हणजे पैशांचा खेळ होता, असे या संघटनेने म्हटले आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी खर्च केलेली रक्कम ९५०० ते १० हजार ५०० कोटी रुपये इतकी होती. कर्नाटकमध्ये गेल्या निवडणुकीत झालेल्या खर्चापेक्षा दुपटीहून अधिक खर्च या वेळी झाला असल्याचे देखील या संघटनेने म्हंटले आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...