कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भरसभेत काढल्या झोपा; व्हिडियो सोशल मिडीयावर ट्रोल

सिद्धरामय्या

बेंगळुरूः कर्नाटक विधानसभेची निवडणूक १२ दिवसांवर येऊन पोहोचली आहे. सगळीकडे प्रचाराचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेस मध्ये जोरदार लढाई होणार आहे. दरम्यान, विद्यमान मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सिद्धरामय्या हे कलबुर्गी इथल्या सभेत चक्क पेंगताना दिसले.

सिद्धरामय्या कलबुर्गी यांचा व्हिडीयो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सिद्धरामय्या यांना शेजारच्या नेत्यांना जागं केल्यावर सिद्धरामय्या यांनी डोळे उघडले, पण त्यांना काही केल्या झोप आवरतच नव्हती. त्यामुळे सिद्धरामय्या पुन्हा ढार-ढूर झोपी गेले.

नेटकऱ्यांनी मुख्यमंत्री  सिद्धरामय्या यांची सोशल मिडीयावर चांगलीच खल्ली उडवली आहे.

 Loading…
Loading...