कर्नाटक पोटनिवडणूक : भाजपचा फुसका बार, चार जागांवर दारुण पराभव

blank

कर्नाटक : कर्नाटकमध्ये 3 लोकसभा आणि 2 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत. आज (मंगळवारी) या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. या पोटनिवडणुकांच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून काँग्रेस-जेडीस यांची 4-1 ने विजय निश्चित मानला जात असून भाजपला फक्त शिमोग्यातच विजय मिळविता आला आहे.

blank

भाजपाच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा मानसपुत्र आणि खाण घोटाळ्यातील आरोपी जनार्दन रेड्डी यांच्या बळ्ळारी मतदारसंघात भाजपवर मोठी नामुष्की ओढवली आहे. काँग्रेसचे उमेदवार व्हीएस उग्राप्पा यांनी भाजपाच्या जे शांता यांच्यावर तब्बल 243161 मतांनी विजय मिळविला आहे. बळ्ळारी हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता.

तीन लोकसभा आणि दोन विधानसभा जागांपैकी चार जागांवर काँग्रेस- जेडी(एस) युतीने विजय मिळवला आहे. तर भाजपला केवळ शिमोगा लोकसभेची एकच जागा मिळवता आली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांना हा विजय म्हणजे दिवाळीची भेट असल्याचे म्हटले आहे. जनतेने भाजपला नाकारले आहे, असेही ते म्हणाले.काँग्रेसने जमखंडी आणि बेल्लारी जागेवर विजय मिळवला आहे. तर जेडी (एस) ने रामनगर आणि मंड्या येथील जागा जिंकली आहे.