बेळगावमध्ये निष्पाप मराठी भाषिक आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार

blank

बेळगाव : कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ “काळा दिन” पाळून मूक सायकल फेरी काढणाऱ्या बेळगावातील निष्पाप मराठी भाषिक आंदोलकांवर कर्नाटकी पोलिसांनी तुफान लाठीमार केला. यात अनेक मराठी तरुण जखमी झाले आहेत. बेळगाव, बिदर, भालकीसह मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अन्यायाने बेळगावसह सीमाभाग कर्नाटकात अन्यायाने डांबल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे काळा दिन पाळून भव्य सायकल फेरी काढण्यात आली. सायकल फेरीत हजारो मराठी भाषिक सहभागी झाले होते. गेल्या 62 वर्षांपासून कर्नाटक राज्योत्सव दिनी समितीतर्फे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी काळा दिवस पाळण्यात येतो.

‘बेळगाव आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे,”रहेंगे तो जेल में नही तो महाराष्ट्र में’, ‘जय भवानी जय शिवाजी,’ अशा घोषणा सायकल फेरीत सहभागी झालेले मराठी भाषिक देत होते. अनेकांनी आपल्या हातात विविध फलक धरले होते. निषेध करण्यासाठी म्हणून अनेकांनी काळे शर्ट, टी शर्ट परिधान केले होते. दंडावर काळ्या फिती देखील बांधून तरुण सहभागी झाले होते. ही रॅली शांततेत सुरु असताना कर्नाटक पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.