घराणेशाहीला लगाम, येदियुरप्पांच्या मुलाचे तिकीट भाजपने कापले

bs yediyirappa

टीम महाराष्ट्र देशा- आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बी. एस. येदियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांना उमेदवारी दिली जाणार नसल्याचं भाजपने स्पष्ट केलं आहे. भाजपचे कर्नाटकचे प्रभारी पी. मुरलीधर राव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पक्ष घराणेशाहीच्या विरोधात असल्याचा दावा राव यांनी केला आहे.

लोकशाही व घराणेशाहीसोबत वाटचाल करू शकत नाहीत- पी. मुरलीधर राव

लोकशाही व घराणेशाहीसोबत वाटचाल करू शकत नाहीत. भाजप घराणेशाहीच्या कट्टर विरोधात आहे. घराणेशाहीवरून आम्ही काँग्रेसवर टीका केली आहे.आम्ही विजयेंद्र यांना प्रचारात सक्रिय राहण्यास मनाई केलेली नाही. भाजप वगळता हा रोग इतर सर्व पक्षांमध्ये असल्याचा आरोपही राव यांनी केला.