Karnataka Election; लिंगायत समाज बहुसंख्य असलेल्या मतदार संघातून भाजप आघाडीवर

bjp wins karnataka

बंगळूरू – कर्नाटक निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालावरून भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तर कॉंग्रेसची मात्र पीछेहाट झाली आहे. दरम्यान कर्नाटकात लिंगायत मतदारांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघात भाजपा सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. लिंगायत मतदारांचा प्रभाव असलेल्या २९ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. काँग्रेस त्या तुलनेत बरीच पिछाडीवर पडली आहे. लिंगायत मते निर्णयाक असलेल्या मतदारसंघात काँग्रेस ९ आणि जनता दल सेक्युलर सहा जागांवर आघाडीवर आहे.

दरम्यान कर्नाटक निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्मची मान्यता देण्यात यावी अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली होती यावरून प्रचंड राजकारण करण्यात आले होते मात्र या मुद्यावरही लिंगायत समाजाचे मत आपल्याकडे ओळवण्यात कॉंग्रेसला अपयश आले. काँग्रेसने ४९ लिंगायत आणि ४६ वोक्कालिगाना उमेदवारी दिली आहे तर भाजपाचे ६८ लिंगायत आणि ३८ वोक्कालिगाना संधी दिली आहे. जेडीएसने ४१ लिंगायत आणि ५५ वोक्कालिगाना उमेदवारी दिली आहे.

2 Comments

Click here to post a comment