कर्नाटकात 12 वाजेपर्यंत ३० टक्के मतदान

बंगरुळु – आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून, दरम्यान काँग्रेस, भाजपा आणि जनता दल सेक्यूलर अशी तिरंगी लढत असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी बारा वाजेपर्यंत ३० टक्के मतदान झाले आहे.भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी.एस.येडियुरप्पा आणि जेडीएसचे प्रमुख देवेगौडा यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

विधानसभेच्या २२२ जागांसाठी सुमारे ५ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीच्या निकालाचे परिणाम देशाच्या राजकारणावर होणार असल्याने या निवडणुकीकडे देशभराचे लक्ष लागले आहे.

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वीची सेमीफायनल म्हणून कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे बघितले जाते. दक्षिण भारतात प्रवेश करण्यासाठी भाजपाला कर्नाटकमधील विजय महत्त्वाचा असून कर्नाटकमधील सत्ता कायम राखून प्रतिष्ठा टिकवण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे. निवडणुकीच्या प्रचारात भाजपा आणि काँग्रेसने एकमेकांवर विखारी टीका देखील केली होती. भ्रष्टाचारावरुन दोन्ही पक्षांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली होती.