fbpx

आता सरकार कोसळले तरी चालेल; पण आणखी सहन करणार नाही – एच. डी. कुमारस्वामी

टीम महाराष्ट्र देशा : प्रदेश काँग्रेसवर वचक ठेवण्याच्या नादात समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या काँग्रेस-निजद आघाडी सरकारवर हक्क गाजविण्याचा प्रयत्न करत आहेत. यापुढे सरकार कोसळले तरी चालेल; पण आणखी सहन करणार नसल्याची नाराजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आपल्या निकटवर्तीयांसमोर व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सिद्धरामय्या हे सरकारवर वचक ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या धोरणामुळे आपल्या पक्षाचा बळी देणार नाही. आपल्या मर्जीतील आमदारांना त्यांनी मंत्रिपदी बसविले आहे. यामुळे सरकारवर त्यांचा प्रभाव राहणार हे निश्चित आहे. आगामी काळात होणार्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सरकारचा वापर होणार असल्याने मुख्यमंत्रिपदाला वाईट नाव येण्याची शक्यता आहे. सत्तेवर आल्यानंतर शेतकर्यांची कर्जमाफी, फेरीवाल्यांना छोट्या रकमेचे कर्ज आदी योजना जारी केल्या आहेत. तरीही आपले नाव वाईट झाले तर काय करायचे? अशी भीती त्यांनी निकटवर्तीयांसमोर व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आतापर्यंत त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. सुमारे 15 आमदार अजूनही भाजपप्रवेशाच्या तयारीत आहेत. ते गेले तरी आता काळजी नाही. त्यांना अडविणार नाही. गेल्या सात महिन्यांपासून मुख्यमंत्रिपदी राहून चांगले कार्य केले आहे. जनतेच्या हितासाठी दिवसरात्र परिश्रम घेत असताना निजदकडून काँग्रेसवर दबावाचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप दररोज केला जात आहे. यापुढे असे ऐकून घेणे आता अशक्य आहे. आता सरकार कोसळले तरी कोणतीच काळजी नसल्याचे दु:ख त्यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे व्यक्त केल्याचे समजते.

2 Comments

Click here to post a comment