fbpx

रश्मी बागलांच्या हाती शिवबंधन, तर संजय मामा शिंदे राष्ट्रवादीचे उमेदवार

टीम महाराष्ट्र देशा: करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रश्मी बागल आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. बागल यांच्या शिवसेना प्रवेशाने विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या अडचणी वाढणार आहेत, दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून झेडपी अध्यक्ष संजय शिंदे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.

रश्मी बागल यांनी सोमवारी कार्यकर्त्यांची बैठक घेत शिवसेनेत जाण्याचा निर्णय घोषित केला आहे. बागल गट आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे एका बाजूला संजय शिंदे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँगेसचा मार्ग मोकळा होत आहे. तर करमाळ्याचे विद्यमान शिवसेना आमदार नारायण पाटील यांच्या उमेदवारीला कात्री लागण्याची शक्यता आहे. पाटील यांच्याकडून शिवसेनेची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संजय शिंदे यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा विधानसभेकडे वळवला आहे. राष्ट्रवादीकडून देखील त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने बागल यांनी शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आता करमाळा विधानसभेच्या निवडणुकीत नेते तेच पण चिन्ह वेगवेगळी असणार हे निश्चित झाल आहे.

महत्वाच्या बातम्या