मकाई सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचा आदेश

करमाळा – ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) न देणाऱ्या राज्यातील सहा साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करावी, तसेच संबंधित कारखान्यांकडून एफआरपीची रक्कम व्याजासहित वसूल करण्यात यावी, अशा सूचना साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यामध्ये करमाळा तालुक्यातील भिलारवाडी येथे असलेल्या मकाई साखर कारखान्याचा समावेश आहे.

एफआरपीची रक्कम न देणाऱ्या कारखान्यांमध्ये सांगलीतील २, सोलापूरमधील ३ आणि उस्मानाबाद येथील १ अशा सहा कारखान्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांच्या ताब्यात असलेल्या करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी कारखान्याने ७ कोटी ३२ लाख ५२ हजार रूपयांची रक्कम थकवलेली आहे.

मकाई कारखाण्यासंदर्भात सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी तहसीदार यांना पत्र पाठवले असून त्यामध्ये करखाण्याने उत्पादित केलेली साखर मोलॅसीस आणि बगॅस इ उत्पादनाची विक्री करून वसूल करण्याकामी कारखाण्याच्या स्वतःच्या जंगम व स्थावर मालमत्तेची विहित पद्धतीने विक्री करून वसूल करण्यासाठी प्रमाणपत्र निर्गमित केले आहे.

बागल गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे कारण सध्या करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरू असून मकाई वर जप्तीचे आदेश आल्यामुळे राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांची डोकेदुखी वाढलेली असून बागल गट चांगलाच अडचणीत आलेला आहे.

मकाई बरोबर आदिनाथ साखर कारखान्यावर बागल गटाची सत्ता असून कारखान्यातील कामगारांचा गेल्या वीस पेक्षा जास्त महिन्यांचा पगार थकलेला आहे.

ब्रेकिंग : माळशेज घाटात दरड कोसळली ; वाहतूक पूर्णपणे बंद