करमाळा : माजी विद्यार्थ्यांनी साकारले गुरूचे स्मारक, नागराज मंजुळे यांच्या हस्ते लोकार्पण

करमाळा/गौरव मोरे : करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत हायस्कूल मध्ये माजी विद्यार्थ्यांच्या वतीने भारत शैक्षणिक संकुलाचे माजी संस्थापक आणि माजी प्राचार्य कै मु. ना कदम यांचे पुर्णाकृती पुतळा आणि भव्य स्मारकाचे लोकार्पण येत्या २३ ऑगस्ट ला सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक आणि जेऊरचे सुपुत्र नागराज मंजुळे यांच्या हस्ते होत आहे.

जेऊर मधील भारत हायस्कूलच्या प्रांगणात हे स्मारक होणार असून भारत हायस्कूलचे माजी विद्यार्थ्यांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे. कै मुरलीधर नागनाथ उर्फ मु.ना कदम सरांनी भारत शैक्षणिक संकुलात खूप मोठे योगदान दिलेले आहे. मु ना कदम सरांचा जन्म १९ मार्च १९२९ रोजी झाला. लहानपणी आई-वडीलांचे छत्र हरपले, स्वःताच्या बळावर त्यांनी पदवीचे शिक्षण सोलापूरात तर बी.टी चे शिक्षण पुणे येथे घेतले. त्यांनतर त्यांनी सोलापूरात लोणकर शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली.

१९५२ रोजी जेऊर सारख्या गावा मध्ये लोणकर प्रशालेची शाळा जेऊर मध्ये सुरू झाली आणि मुख्याध्यापक म्हणून कदम सर ज्वाईन झाले परंतु काही वर्षांनी ही शाळा बंद झाली. त्या काळातील शिक्षणाची गरज ओळखून कदम सरांनी भारत शैक्षणिक संस्थेची स्थापना केली आणि दीर्घकाळ या हायस्कूलचे प्राचार्य ही होते.

अनेक विद्यार्थी घडविले.त्यांच्या संपर्कात येणारा प्रत्येक माणूस हा त्यांचा कायमस्वरूपी मित्र, हितचिंतक होत असे. हजारो विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मु.ना कदम सरांचा सिंहाचा वाटा आहे. प्रत्येक मुलात काहीतरी दडलेले असतेच. त्यास हिऱ्याप्रमाणे पैलू पाडण्याची, त्याच्यातील गुणवैशिष्ट्ये शोधण्याची व त्याला प्रगतीची संधी देण्याची भूमिका त्यावेळी कदम सरांनी घेतली. कदम सरांनी ग्रामीण भागातील प्रज्ञावान, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी जेऊर येथे १९७२ मध्ये मोफत वसतिगृहयुक्त हायस्कूलची स्थापना केली. या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष तसेच प्राचार्य ही होते. कदम सरांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत अप्रतिम बदल घडवून आणला आहे.संस्कारांची निर्मिती व रुजवणूक करण्यात आजचे शिक्षण अपयशी ठरले आहे. शिक्षण वळण राहिले नसून दळण बनले आहे. विद्यार्थ्यांची संख्यात्मक वाढ झाली पण गुणात्मक वाढ सध्या कमी झालेली आहे, कदम सरांनी त्यावेळी केलेल्या योगदानामुळे अनेक विद्यार्थी घडले.

या दिलेल्या योगदानाबद्दल कै मु ना कदम सर यांचे पुर्णाकृती पुतळा आणि भव्य स्मारक भारत हायस्कूलच्या प्रांगणात येत्या २३ ऑगस्टला भारत संस्थेचे सध्याचे अध्यक्ष आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते होणार आहे.

माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार

कै मु ना कदम सरांच्या पुतळा साठी भारत हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी यासाठी पुढाकार घेऊन या स्मारकासाठी निधी उपलब्ध केला.

समिती स्थापन करून निधी केला गोळा

कै मु ना कदम सर यांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी प्राचार्य मु ना कदम सर समिती स्थापन करण्यात आली होती या समितीमध्ये शिवसेनेचे आमदार नारायण पाटील, अंबरशेठ लुनावात, विलास जेऊरकर, सतीश सुराणा, सुमतीलाल लुणावत, भारत चुंबळकर, नवीन दोशी, सारंग साठे, नागेश माहुले सर, रमेश खत्री, अभयराज लुंकड, अनिल गदिया, किशोर राठोड यांनी विशेष योगदान दिले.

महत्वाच्या बातम्या