fbpx

करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरा, शिवप्रताप युवा प्रतिष्ठानची मागणी

करमाळा : करमाळा उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रूग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे या रुगणालयातील रिक्त पदं तात्काळ भरावीत अन्यथा रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा ईशारा शिवप्रताप युवा प्रतिष्ठानने दिला आहे.

करमाळा येथील शासकीय रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालय म्हणुन ओळखले जाते, रुग्णालयाची भव्य अशी ईमारत असुन सुद्धा रिक्त पदामुळे रुग्णालयाचे नाव मोठे व लक्षण खोटे. अशी परस्थीती झाली आहे. या ठिकाणी सध्या वैद्यकीय अधिक्षक सेवानिवृत्त झाल्याने अधिक्षकाविनाच या रुग्णालयाचा कारभार चालत आहे, तसेच वैद्यकीय अधीकारी यांची चार पदे, परिसेवीकीची दोन पदे, भुलतज्ञ, स्त्रीरोग तज्ञ ही महत्वाची पदे रिक्त आहेत .

केवळ दोन वैद्यकीय अधिकारी व अधीपरिसेवीकांवरच हा दवाखाना चालत आहे, या दवाखान्यात तालुक्यातील खेड्यापाड्यातुन शेकडो रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात, येणाऱ्या रुगणांची संख्या मोठी असल्याने व उपचार करणाऱ्यांची संख्या कमी असल्याने रुग्णाची हेळसांड होत आहे. अनेक गोरगरीब रुग्ण खासगी दवाखान्यातील उपचार परवडत नसताना सुद्धा खासगी दवाखान्याचा मार्ग अवलंबत आहेत

वास्तविक हे उपजिल्हा रुगणालय असल्याने या ठीकाणी सिझेरीयन प्रसूती, सर्प दंश, श्वान दंश, एक्सरे, अशा सुविधा असणे गरजेचे आहे मात्र या ठीकाणी वरिल प्रकारचे रुग्ण अल्यास फक्त सलाईन लावून सोलापुर सिव्हील येथे रेफर केले जाते किंवा खासगी दवाखान्यात जावे लागत आहे. त्यामुळे गोरगरीब, अशिक्षित रुग्णांची अवस्था भिक नको पण कुत्र आवर अशी होत आहे. त्यामुळे या रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरावीत अशी मागणी तालुक्यातुन होत आहे.

करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची पदं बऱ्याच दिवसापासुन रिक्त आहेत, त्यामुळे सिझेरीयन तर सोडाच परंतु नॉर्मल प्रसुती होणे सुद्धा मुश्किल झाले आहे, सर्प दंश, रेबीज साठी सोलापुर सिव्हीला रेफर केले जात आहे, रुग्णांकडे वेळ अपुरा असल्याने ते खासगी दवाखान्याचा पर्याय अवलंबत आहेत. त्याठिकाणी मोठी लुठ होत आहे. मग एवढ्या मोठ्या रुग्णालय व त्यावर होत असलेला खर्च काय कामाचा म्हणुन या महिन्याभरात रिक्त पदे भरली नाहीत, तर रुग्णालयाला टाळे ठोकले जाईल

– शंभुराजे फरतडे (संस्थापक शिवप्रताप युवा प्रतिष्ठान)

परळमधील क्रिस्टल टॉवरला आग, २ जणांचा मृत्यू