उजनीची शंभरीकडे वाटचाल, भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

करमाळा/अनिता व्हटकर : सोलापूर जिल्ह्याची वरदायणी उजनी धरणाची शंभरीकडे वाटचाल सुरू असून येत्या चार ते पाच दिवसांत उजनी धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. गेल्या एक आठवड्यापासून भिमा खोरे परिसरात दमदार पाऊस सुरू असल्यामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झालेली असून भिमा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. सध्या उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग-

दौंड – ५७ हजार ६५४ क्युसेक्स
घोड धरण – २ हजार क्युसेक्स
बंद गार्डन – ३४ हजार ३०० क्युसेक्स
पारगावं – ६० हजार क्युसेक्स
संगम – ८ हजार ४०५ क्युसेक्स
पंढरपूर – १२ हजार १०० क्युसेक्स
इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

आज सकाळी ८ वाजेपर्यंत उजनी धरण ६९.२६% इतके भरले असून गेल्या वर्षी याच दिवशी उजनी धरण ५४.२६% इतके भरलेले होते.

अटक होण्याची भीती वाटत असणाऱ्या साधकांना सनातनचा अजब सल्ला