करमाळा : शेतकऱ्याचे प्रश्न केंद्रस्थानी ठेऊन निवडणूक लढवणार – दिपक चव्हाण

करमाळा : शेतकर्यांचे प्रलंबित प्रश्न, करमाळा बाजार समिती मध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी भाजप बाजार समिती निवडणूक लढविणार असल्याचे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दिपक चव्हाण यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना सांगितले.

राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून सर्व सामान्य शेतकऱ्यांना प्रथमच बाजार मतदानाचा अधिकार मिळाला असून भाजप सरकारने दिलेला मतदान अधिकाराचा नक्कीच फायदा थेट शेतकऱ्यांना होणार असून कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे दिपक चव्हाण यांनी सांगितले.

Loading...

आतापर्यंत तालुक्यातील शेतकऱ्यांना तुरीचे हमीभाव तसेच सर्वोदय शेतकरी उत्पादन कंपनीच्या माध्यमातून आणि श्रीराम दुध संघात नाबार्ड कडून दुध उत्पादकांसाठी सबसिडी निर्माण करून दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आमच्यावर विश्वास असून बाजार समिती निवडणूकीत आपला विजय पक्का असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

    आता चौरंगी लढत

भाजप निवडणूक लढविणार असल्याचे चर्चा तालुकाभर सुरू झाल्याने पाटील-बागल-जगताप-शिंदे गटात खळबळ उडालेली आहे. याअगोदर पाटील-जगताप गट एकत्र येऊन निवडणूक लढविणार हे स्पष्ट झालेले होते. बागल गट आणि शिंदे गट स्वबळावर लढणार असून ही निवडणूक तिरंगी होणार असे बोलले जात होते परंतु भाजप कुठल्याही परिस्थिती मध्ये निवडणूक लढणार असल्याने आता ही निवडणूक चौरंगी होणार असे सध्यातरी चित्र आहे.

       ५४ उमेदवारी अर्ज दाखल

दरम्यान करमाळा बाजार समिती निवडणूकीसाठी १८ जागांसाठी शनिवार ११ अॉगस्ट पर्यंत ५४ उमेदवारी अर्ज दाखल झालेले असून १३ अॉगस्ट सोमवारी उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.

करमाळा बाजार समितीची निवडणूक जाहीर विधानसभेची रंगीत तालीम

.0

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील