कमलाईचा आशीर्वाद घेऊन होणार जगताप–पाटील गटाच्या प्रचाराचा शुभारंभ

करमाळा – बहुचर्चित करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीसाठी अखेर तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झालेले असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शेतकरी मतदार संघातून १५ जागांसाठी ४४ अर्ज शिल्लक राहिलेले आहेत. १५ गणातून ही निवडणूक होत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा निवडणुकीसाठी जगताप – पाटील युतीच्या देशभक्त नामदेवरावजी जगताप शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ  दिं. 3१ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता श्री कमला देवी मंदीर करमाळा येथे गटाचे नेते आ. नारायण आबा पाटील , माजी आमदार जयवंतराव जगताप , महिला नेत्या सौ सविता देवी राजे भोसले व अन्य पदाधिकाराच्या उपस्थितीत होणार आहे. यानंतर  मार्केट यार्ड करमाळा येथे जाहीर सभा होणार असुन यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी  बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पॅनेल प्रमुख शहाजीराव देशमुख यांनी केले आहे.