करमाळा : सभापती, उपसभापती निवडणूक : बागल गटाचे पारडे जड तर शिंदे गट तटस्थ राहणार?

sanjay mama shinde

करमाळा/गौरव मोरे- करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती-उपसभापतीपदचा फैसला बुधवार ३ अॉक्टोबरला होणार असून याबाबत मोठी उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

करमाळा बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणूकीत प्रथमच शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळाल्यामुळे ही निवडणूक आगामी विधानसभेची रंगीत तालीम असल्याची चर्चा होती. ह्या निवडणूकीत १८ जागांपैकी ८ जागा पाटील-जगताप गटाच्या आघाडीला मिळाल्या तर बागल गटाला ही ८ जागा मिळाल्या तर सध्या किंगमेकर असलेल्या शिंदे-सावंत गटाकडे दोन जागा आहेत. त्यामुळे सभापती कोण होणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून सभापती कोण होणार म्हणून पारावरच्या चर्चेला जोर आलेला आहे. सध्या बागल गटाचे पारडे जड असून त्यांचा गटाचा सभापती झाला तर दिग्विजय बागल यांची निवड निश्चित आहे. सध्यातरी बागल गटाकडे ८ जागा आहेत सत्ता स्थापन करण्यासाठी १ जागेची आवश्यकता आहे सावंत गटाचे हमाल/ तोलार मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले बागल गटाला पाठिंबा देण्याची शक्यता इहे, तसे झालेतर बागल गटाचे ९ सदस्य होतील आणि बागल गटाचा सभापती होऊ शकतो. तर शिंदे-सावंत गट तटस्थ राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर बागल गटाचे ८ सदस्य राहतील तर माजी आमदार जयवंतराव जगताप वांगी आणि केम गणातून निवडून आल्यामुळे सभापती निवडीत त्यांची एक जागा कमी होऊ शकते परिणामी त्यांच्याकडे ७ सदस्य राहतील. शिंदे-सावंत गट तटस्थ राहिला तर याचा फायदा बागल गटाला होणार आहे.

आगामी विधानसभा निवडणूकीत कुठल्याही प्रकारची ‘रिस्क’ जि. प. अध्यक्ष संजय शिंदे यांना घ्यायची नसल्यामुळे ते बागल किंवा पाटील-जगताप आघाडी यापैकी कुणाला पाठिंबा देतील का नाही देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

चर्चा, चर्चा आणि फक्त चर्चाच
सध्या तालुकाभर सभापती कोण होणारा याकडे सर्व लक्ष लागून राहिलेले असले तरी बागल गटांकडून दिग्विजय बागल, पाटील-जगताप आघाडी कडून जयवंतराव जगताप यांच्या नावाची चर्चा सुरू आहे तर किंगमेकर ठरलेल्या शिंदे गटाच्या चंद्रकांत सरडे यांना सध्या दोन्हीही गटांकडून सभापती पदाची औफर आहे. तर सभापती निवडीत पाठिंबा द्यायचा का तटस्थ राहायचे हे जि. प. अध्यक्ष संजय शिंदेच घेतीला आसेही बोलले जात आहे.

करमाळा बाजार समिती त्रिशंकू; सत्तेच्या चाव्या शिंदे-सावंत गटाच्या हातात

बाजार समितीवर पाटील-जगताप गटाचाच सभापती ?