देशभक्त कै. नामदेवराव जगताप शेतकरी विकास पॅनलला शेतकरी मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

करमाळा : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येत्या ९ तारखेला होत असलेल्या निवडणूकीच्या रणधूमाळीत जगताप – पाटील यूतीच्या ‘देशभक्त कै. नामदेवराव जगताप शेतकरी विकास पॅनल’ने प्रचारात आघाडी घेतली आहे. शेतकरी प्रतिनिधींच्या सर्वच गणातील उमेदवारांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे.

जगताप गटाचे सर्वेसर्वा माजी आमदार जयवंतराव जगताप, पाटील गटाचे प्रमूख विद्यमान आमदार नारायण आबा पाटील, मोहिते पाटील गटाच्या जि.प. सदस्या सौ. सविताराजे भोसले, अजित तळेकर, तसेच नगराध्यक्ष युवा नेते वैभवराजे जगताप, माजी उपनगराध्यक्ष नारायण बापू जगताप, पं.स. सभापती शेखर गाडे, उपसभापती गहिनिनाथ ननवरे, तसेच यूतीमधील सर्व गटाचे आजी -माजी पदाधिकारी व कार्यकर्ते दिवसभर शेतकरी मतदारांपर्यंत ‘होम टू होम’ प्रचार, कॉर्नर सभा, गाव फेरी काढून , व सांयकाळच्या सत्रात भव्य सभांना उपस्थित राहत आहेत. होम टू होम प्रचार करताना सर्वच गणात एकंदरीत शेतकरी वर्गात मार्केट कमिटीच्या चोख कारभाराचीच चर्चा आहे. भाऊंशिवाय मार्केट कमिटी कोणीच चांगली चालवु शकत नाही अशी चर्चा आहे.

Loading...

 अतिशय आपुलकिने वेगवेगळ्या गावचे ग्रामस्थ उमेदवार व नेत्यांचे स्वागत करत आहेत. एकंदरीत शेतकरी मतदार उस्फुर्तपणे भाऊंच्या व नारायण आबाच्या युतीला कौल देतील व ढाल -तलवारीवर शिक्का मारुन विजयाची हॅट्रीक करतील असे चित्र आहे. आतापर्यंत करमाळा , केत्तुर, कोर्टी येथिल भव्य सभा पाहता व लोकांचा प्रतिसाद पाहता जगताप – पाटील यूती यात बाजी मारणार हे निश्चीत आहे.

मार्केट कमिटी चालवण्याची धमक फक्त जयवंतराव जगताप यांच्या कडेच आहे त्यातच आमदार नारायण आबांनी बिनशर्त पाठींबा देवून युती झाली आहे त्यामूळे ही शेतकऱ्यांची मार्केट कमिटी जगताप – पाटील गटाकडेच राहीली पाहिजे, साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे रक्त पिणाऱ्या भ्रष्ट मंडळींना या स्वच्छ कारभार असलेल्या संस्थेपासून चार हात दूरच ठेवले पाहीजे.आमच्या गणात शंभूराजेनां निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू व सर्वाधिक लिड देवु- सुरेश शिंदे, पोथरे (सामान्य शेतकरी मतदार)

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...