करमाळ्यात पाटील-बागल-जगताप-शिंदे यांच्यातच लढत

narayan patil, rashmi bagal, jayvantrav jagtap

करमाळा/गौरव मोरे- आगामी एक ते दीड वर्षात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात एकत्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तशा प्रकारच्या हालचालींना वेग आला असून तसे झाले, तर या दोन्ही निवडणुका वर्षभरात किंवा या वर्षअखेरीसही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेबरोबर विधानसभेचीही तयारी प्रमुख राजकीय पक्षांनी सुरू केली आहे.

करमाळा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार नारायण पाटील हे शिवसेनेकडून लढणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची ठरणार आहे.दुसरीकडे राष्ट्रवादी कडून रश्मी बागल ह्या लढणार आहे नुकत्याच झालेल्या हल्ला बोल यात्रेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रश्मी बागल या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत अशी घोषणा केलेली आहे.

युतीची शक्यता नसल्याने गतवेळेप्रमाणे २०१९ मध्ये शिवसेना आणि भाजपचा उमेदवार असणार आहे. मागील २०१४ निवडणूकीत शिवसेनेकडून नारायण पाटील तर भाजप पुरस्कृत सध्याचे जि. प. अध्यक्ष संजय शिंदे लढले होते. त्यामुळे यावेळी संजय शिंदे कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढणार हे मात्र गुलदस्त्यात आहे. परंतु काहीही झाले तरी आगामी करमाळा विधानसभा लढविणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.

सध्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेसचे २०१४ प्रमाणे वेगवेगळे न लढता एकत्र जर लढले तर डी सी सी बँकचे व्हा. चेअरमन जयवंत जगताप यांना पक्ष शोधावा लागणार आहे कारण मागील २०१४ निवडणूकीत जगताप कॉंग्रेस कडून निवडणूक लढले होते. आणि करमाळ्याची जागा पहिल्यापासून राष्ट्रवादी कडे आहे.

२००९ ला करमाळा मतदारसंघाचा पुनर्रचना झाली आणि राष्ट्रवादी कडून माजी आमदार श्यामल बागल पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आल्या. त्यावेळी सध्याचे शिवसेनेचे आमदार नारायण पाटील दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

२०१४ विधानसभा निवडणूकीत नारायण पाटील शिवसेनेकडून निवडणूक लढले आणि आमदार झाले. राष्ट्रवादीच्या रश्मी बागल आणि भाजप पुरस्कृत संजय शिंदे यांचा पराभव करून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.

करमाळा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर एकूणच एकमेकांचे याअगोदरचे प्रतिस्पर्धी राहिलेले पुन्हा २०१९ ला भिडणार यात काही शंका नाही. आमदार नारायण पाटील यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांना गत विधानसभा निवडणुकीचा अनुभव आहे. तर जि प अध्यक्ष संजय शिंदे यांनीही २०१४ करमाळा विधानसभा लढविली होती. तसेच माजी आमदार जयवंत जगताप यांनाही विधानसभेचा अनुभव आहे.

करमाळा विधानसभा निवडणुकीचा अनुभव असलेले एकमेकांचे कच्चे दुवे ठाऊक असलेले चारही मातब्बर पुन्हा २०१९ ला करमाळा विधानसभेच्या आखाड्यात दिसणार आहेत.त्यात कोण विजयी होतो,याची प्रतीक्षा आहे.