‘सांगली येथील पूरग्रस्तांना करमाळा वरून मदतीसाठी गेलेल्या बोटीने अनेकांना काढले बाहेर’

कंदर: सांगली येथील अडकलेल्या पूरग्रस्तांना मदतीसाठी करमाळा तालुक्यातील कंदर व कोंढारचिंचोली येथील पट्टीचे पोहणारे मच्छीमार असे १९ युवकांचे पथक मदतीसाठी पाठवण्यात आले होते. एकमेका सहाय्य करू, अवघा धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे गेलेल्या युवकांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना पाण्यातून बाहेर काढून प्रशासन व स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने सुरक्षितस्थळी पोहचवण्याचे कार्य केले. ऐनवेळी करमाळाकरांनी केलेली मदत सांगलीकरांसाठी उपयोगाची ठरली असल्याचे दिसून येते आहे. मदतीसाठी गेलेल्या युवकांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, सांगली येथे झालेल्या मुसळधार पावसाने सांगली येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मदतीसाठी स्थानिक यंत्रणा तोकडी पडत आहे. पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांच्या निर्देशानुसार सांगली भागात मदत करणेसाठी पथक पाठवण्याचे सांगितले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी कंदर ता करमाळा येथील ७ बोटी, १४ जण व कोंढार चिंचोली येथील ५ बोटी व ५ जण निवडले. गुरुवारी रात्री उशिरा ते सांगलीकडे रवाना झाले. ते तिथे शुक्रवारी सकाळी पोहचले. पोहचताच त्यांनी मदतकार्यात सुरुवात केली.

सांगली महानगरपालिका आयुक्त नितिन कापडनिस, उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा भागातून गेलेल्या बोटीने सांगली गावभाग, वखारभाग, सराफ कट्टा येथे मदतकार्य सुरु आहे. पुरातून बाहेर काढलेल्या मध्ये लहान मुले, वृद्ध यांचा समावेश आहे. दिवसभरात हजारोंना बाहेर काढण्यात आले. मदतीसाठी सांगली येथील आयुष सेवाभावी संस्था अध्यक्ष अमोल पाटील, गुंठेवारी चळवळीचे अध्यक्ष चंदन चव्हाण, अजित कांबळे, महानगरपालिका कर्मचारी व इतर सर्व नागरिक मदतकार्यासाठी उपस्थित होते. करमाळ्यातुन मच्छीमारांनी सुरू केलेल्या मदतीचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे. तर पूरग्रस्तांना मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत.

मदतीसाठी जाणारे खाजगी मच्छीमारांचे हे पहिले पथक आहे. कालपासून बचाव कार्य सुरू आहे. तिथे पाठवलेल्या बोटीतून हजारोंना बाहेर काढण्यात आले आहे. तर महसुलचे आणखी काही कर्मचारी येथून जाणार आहेत.

कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यात येत्या 48 तासात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

 

पाणीपुरवठा योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही

 

जाणून घ्या अरुण जेटलींची प्रकृती आता कशी आहे ?