fbpx

करमाळा बाजार समितीची निवडणूक जाहीर विधानसभेची रंगीत तालीम

EVM

करमाळा – गेल्या काही महिन्यांपासून लक्ष लागून राहिलेल्या करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झालेली असून ९ सप्टेंबरला मतदान होणार आहे. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर बाजार समितीचा निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला असून आगामी विधानसभा निवडणूक पाहता करमाळा तालुक्यासाठी ही शेवटची निवडणूक असणार आहे.
पुढील महिन्यात रविवार ९ सप्टेंबरला मतदान होणार असून मंगळवार ११ सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे.या निवडणूकीत प्रथमच शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळाला असल्यामुळे ही निवडणूक आगामी विधानसभेची रंगीत तालीम राहणार आहे.
पारंपारिक पाटील-बागल-जगताप-शिंदे गटात ही निवडणूक होणार हे निश्चित असून या निवडणूकीत कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होईल.

 

आमदार होण्यापासून मला कूणीच रोखू शकत नाही : आशाताई बुचके