करमाळा बाजार समिती निवडणूक: पाटील-बागल-जगताप गटाची प्रतिष्ठा पणाला

narayan patil, rashmi bagal, jayvantrav jagtap

करमाळा- करमाळा कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूकीला मुदत वाढ मिळालेली असली तरी
आगामी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता मिळविण्यासाठी पाटील-बागल-जगताप गटांबरोबरच संजय शिंदे गटांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पहायला मिळणार आहे.या निवडणूकीच्या आडून आगामी विधानसभा निवडणूकीची रंगीत तालीम रंगणार आहे.या निकालावरच करमाळा विधानसभेची पुढील राजकीय भविष्ये व गणिते स्पष्ट होणार आहेत. पारंपारिक पाटील-बागल-जगताप गटाला ही निवडणूक म्हणजे आरपारची लढाई मानली जात आहे.

करमाळा कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कधी होणार ही आणखी निश्चित नसली तरी बाजार समिती निवडणूकीसाठी प्रथमच शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळाल्यामुळे ही निवडणूक सर्वांसाठी प्रतिष्ठेची झालेली आहे कारण या निवडणूकीवर आगामी करमाळा विधानसभेची समीकरणे स्पष्ट होणार आहे.

Loading...

सोलापूर जिल्ह्यात चांगली करमाळा बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या या समितीची वार्षिक उलाढाल सुमारे ३ ते ४ कोटींच्या पुढे आहे ही बाजार समिती आपल्या ताब्यात आल्यास आगामी विधानसभा सोपी जाईल असा चंग बांधून करमाळा तालुक्यातील नेतेमंडळीनी आपली कंबर या निवडणूकीसाठी चांगलीच कसलेली आहे.

करमाळा बाजार समिती निवडणूकीत गटबाजी,पाडापाडी,शह-काटशहाच्या राजकारणात खोलवर जाण्याची शक्यता.कारण या निवडणूकीत प्रथमच शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार मिळालेला आहे.सध्या करमाळा बाजार समितीवर जगताप-पाटील गटाची सत्ता असून सध्यातरी पाटील-बागल-जगताप तसेच संजय शिंदे गट सध्यातरी स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केलेली असल्याचे पहायला मिळत आहे.

मागील २०१४ विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांचा पराभव करून तालुक्यात वर्चस्व निर्माण केले, विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आमदार निधीतून विकास कामांच्या जोरावर गेल्या चार वर्षात ग्रामपंचायत आणि जि प निवडणूकीत पाटील गटाला चांगले यश मिळालेले आहे तर आदिनाथ आणि मकाई साखर कारखाना सोडला तर बागल गटाला फारसे यश मिळालेले नाही. तर दुसरी कडे जि प अध्यक्ष संजय शिंदे यांनी मागील विधानसभा तसेच ग्रामपंचायत आणि जि प व पं समिती निवडणूकीत भुवया उंचविणारे कामगिरी केल्यामुळे आगामी बाजार समितीवर काय करिष्मा करणार हे पाहणे उत्सुकतेचे होणार आहे तर सध्याचे बाजार समितीचे विद्यमान अध्यक्ष जयवंत जगताप यांच्या कडे गेल्या २५ वर्षांपासून बाजार समिती ताब्यात आहे यावेळी ते काय करिष्मा करणार याकडे लक्ष लागून आहे. यांनीही तालुक्यातील जनता कुणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बाजार समिती निवडणूकीला अवधी असला तरी या निवडणूकीवर तालुक्यातील चार ही गटांचा डोळा आहे, कारण प्रथमच शेतकऱ्यांना मतदान करता येणार आहे याचा फायदा आगामी विधानसभा निवडणूकीसाठी होणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपमध्ये प्रवेश
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई