करमाळा : उमेदवारांचे देव पाण्यात,कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला

करमाळा / शंभुराजे फरतडे : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितिच्या आठरा जागेसाठी निवडणुक जाहिर झाली होती त्यापैकी हमाल-तोलार व व्यापारी मतदार संघातील तीन जागा बिनविरोध झाल्याने पंधरा जागेसाठी 9 सप्टेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असुन उद्या ११ सप्टेंबर रोजी शासकीय गोदाम येथे सकाळी दहा वाजल्यापासुन मतमोजणीस सुरवात होणार आहे

या निवडणुकीत सत्ताधारी असलेले जगताप ,पाटील,मोहिते-पाटील यांनी युती करुन तर बागल गटाने स्वतंत्र व संजय शिंदे यांनी भाजपाला सोबत घेऊन आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते .

बाजार समिति च्या निवडणुकीत पहिल्यांदाच थेट शेतकऱ्यांना मताचा अधिकार मिळाल्याने या निवडणुकीत एक लाख चौदा हजार दोनशे दोन शेतकरी मतदार मतदान करणार होता. त्या मुळे हि निवडणुक विधान सभेची रंगीत तालीम समजुनच सर्व नेते मंडळीनी संपुर्ण ताकद पणाला लावुन लढवली होती.परंतु मतदार यादीत असलेली दुबार, तिबार नावे तसेच मतदानाच्या दिवशीच शेतकरी बंधुचा म्हत्वाचा समजला जाणारा बैल पोळ्याचा सण असल्याने अवघे 46%टक्के मतदान झाले आहे.

मतदानाची हि कमी टक्केवारी कोणाला फायद्याची व कोणाला तोट्याची ठरणार हे ऊद्या सकाळी दहा वाजल्या पासुन समजायला सुरवात होणार आहे. सुरवातील पाटील जगताप युतीला एकतर्फी वाटणारी हि निवडणुक बागल गट तसेच शिंदे भाजपा युतीने प्रचारत मारलेल्या जोरदार मुसंडी मुळे अत्यंत चुरशीची होणार असल्याची चर्चा आहे .

या निडणुकीत पंधरा उमेदवारांच्या यादी मध्ये विद्यमान सभापती जयवंतराव जगताप, मकाई चेअरमन दिग्विजय बागल,सुभाष गुळवे चंद्रकांत सरडे, दत्ता जाधव,चिंतामणी जगताप,प्रा शिवाजीराव बंडगर दिपक चव्हाण, संतोष वारे, शंभुराजे जगताप, सुजित तात्या बागल सुनिल सावंत हे तगडे उमेदवार रिंगणात आहेत. निकालासाठी फक्त आजची रात्र बाकी असल्याने सर्व उमेदवारांनी देव पाण्यात घातले असुन कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे