fbpx

रोहित पवारांच्या मनसुब्यांना कॉंग्रेसचा ब्रेक, विधानसभा उमेदवारी धोक्यात

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे नातू असणारे रोहित पवार यांनी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी रोहित यांनी कर्जतमधून उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज देखील केला आहे. मात्र आघाडीच्या राजकारणात रोहित पवार यांच्या मनसुब्यावर कॉंग्रेस ब्रेक लावणार असल्याचे दिसत आहे.

आघाडीच्या जागावाटपात आजवर कर्जत जामखेडची जागा कॉंग्रेसकडून लढवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत देखील हा मतदारसंघ कॉंग्रेसकडेच राहणार असल्याचा दावा स्थानिक नेते करत आहेत. जामखेडची जागा यापूर्वी काँग्रेसनेच लढवली होती. त्यामुळे ही जागा सोडणार नाही. असं ठाम मत काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता रोहित यांच्यापुढे अडचण निर्माण झाली आहे.

दरम्यान, कॉंग्रेसने या जागेवर दावा केल्याने राष्ट्रवादीची कोंडी होणार आहे. तसेच निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादीतील स्थानिक पातळीवरचे मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.