करीमलाला फक्त इंदिराच नाही तर बाळासाहेब, पवार, राजीव गांधीनाही भेटत

टीम महाराष्ट्र देशा – करीमलाला हे फक्त इंदिरा गांधी यांनाच नाही तर बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, राजीव गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना भेटत असतं. तसेच करीमलाला यांचा अंडरलवर्ल्डशी  काहीही संबंध नव्हता. ते तर पठाणांचे नेते होते असा दावा करीमलाला यांच्या नातवाने केला आहे.

एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्ड जगताचा डॉन असलेल्या करीमलालाची भेट घ्यायला इंदिरा गांधी येत होत्या असा खासदार संजय राऊत यांनी दावा केला होता. त्यानंतर देशभर राजकीय वर्तुळात वादळ निर्माण झालं.

Loading...

त्यावर आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणावरून काँग्रेसने आक्षेप घेतल्यानंतर संजय राऊत यांनी ते वक्तव्य मागे घेतलं. इंदिरा गांधी यांच्याबद्दल आम्ही चुकीचं काहीही खपवून घेणार नाही असा इशारा काँग्रेसने दिला होता. त्यानंतर राऊतांनी माघार घेतली आणि आपलं वक्तव्य मागे घेत असल्याच माध्यमांना सांगितलं .

आता करीमलाला यांचे नातू सलीम खान आणि जहानजेब खान यांनी यावर अधिक खुलासा केलाय. करीमलाला हे इंदिरा गांधी यांना अनेकदा भेटले आहेत असा दावा त्यांनी केला आहे.

जहानजेब खान यांनी असंही सांगितलं की सरहद गांधी खान अब्दुल गफ्फार खान हे जेव्हा मुंबईत येत तेव्हा ते करीमलाला यांच्याकडे जात असे असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे या वादातून आता आणखी नवनवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की