सीतामातेच्या भूमिकेवरून ट्रोल झालेल्या करीनाने सोडले मौन; म्हणाली…

kareena kapoor

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिने अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटामध्ये काम केल आहे. नुकतेच तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर तिचे वजन अधिक वाढले होते. त्यानंतर आता तिने स्वतःला फिट ठेवण्यासाठी प्रयत्न केल्यांचं दिसत आहे. करिनाने अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले आहे. आता पुन्हा एकदा ती चित्रपटांमध्ये काम करण्यास सज्ज झाली असून ‘रामायण’ या चित्रपटातील सीतामातेच्या भूमिकेसाठी करीनाने तब्बल १२ कोटी रुपायांची मागणी केली होती. यावरून तिला सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. यावर तिने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

एका वृत्तानुसार देण्यात आलेल्या माहितीवरून, काही वर्षांपूर्वी चित्रपटात पुरुष किंवा स्त्रीला समान मानधन मिळण्याविषयी कोणीही बोलत नव्हते. मात्र आता आपल्यापैकी बरेच जण याबद्दल उघडपणे बोलत आहेत. महिलांना आदर मिळाला पाहिजे. हे मागणी करण्याबद्दल नाही, ते महिलांच्या सन्मानाबद्दल आहे आणि गोष्टी बदलल्या पाहिजे’, असे मत तिने व्यक्त केले आहे.

दरम्यान, करीना ‘वीरे दी वेडींग’ आणि हंसल मेहतांच्या आणखी एका चित्रपटासाठी ती काम करत आहे. याशिवाय करीना करण जोहरच्या ‘तख्त’ चित्रपटातही दिसणार आहे. आमिर खानसोबत लवकरच ती ‘लालसिंग चड्डा’ या चित्रपटातही झळकणार आहे.

महत्वाच्या बातम्या