fbpx

‘वोग’ इंडिया मॅग्झीन साठी करीनाचे खास फोटोशूट

टीम महाराष्ट्र देशा : करीना कपूर खान हिने अलीकडेच ‘वोग’ इंडिया मॅग्झीन साठी खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे काही फोटोज समोर आले आहेत. काही फोटोजमध्ये करीना बिकिनीत दिसतेय, तर काहींमध्ये तिने शॉर्ट ड्रेस परिधान केले आहेत. पोस्ट प्रेग्नेंसी वजन कमी केल्यानंतर या रुपात करीना अतिशय हॉट दिसतेय.

Kareena-Kapoor-Khan-cover-image-Vogue-India-January-तब्बल दहा वर्षांनंतर करीनाने बिकिनी परिधान केली आहे. यापूर्वी 2008 मध्ये आलेल्या ‘टशन’ या चित्रपटात करीना लाइम ग्रीन कलरच्या बिकिनीत झळकली होती. या चित्रपटात करीनाने आपल्या झिरो साइज फिगरने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

tashan kareena kapoor bikiniदहा वर्षांनतर करीना त्याच रुपात परतली आहे. फोटोशूटमध्ये करीना ऑरेंज कलरच्या टू पीस बिकिनीत सेक्सी फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय.

Kareena Kapoor Vogue20 डिसेंबर 2016 रोजी करीनाने मुलगा तैमूरला जन्म दिला. बाळाच्या जन्माच्या काही महिन्यांतच करीनाने प्रेग्नेंसीच्या काळात वाढलेले वजन कमी केले. योगा सेशन आणि वर्कआउटच्या मदतीने करीना पुर्वीच्या रुपात परतली.Kareena ‘वीरे दी वेडिंग’ या आगामी चित्रपटातून करीना मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. करीनासोबत सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट सोनमची बहीण रिया कपूर प्रोड्युस करत आहे. तैमूरच्या जन्मानंतर करीनाचा हा पहिला चित्रपट आहे. दोन वर्षांनंतर करीना कमबॅक करत आहे.

veere-di-wedding

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर 

2 Comments

Click here to post a comment