करिना कपूरला सैफसोबत नव्हे तर राहुल गांधींसोबत जायचं होत ‘डेट’ वर

टीम महाराष्ट्र देशा- करिनाच्या ‘पहिल्या डेट’ची माहिती पत्रकार रशीद किदवई यांच्या ‘नेता-अभिनेता : बॉलीवूड स्टार पावर इन इंडियन पॉलिटिक्स’ या पुस्तकामधून समोर आली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना डेट करण्याची इच्छा होती असा दावा या पुस्तकातून करण्यात आला आहे.विशेष म्हणजे राहुल सुद्धा करिनाचा आलेला प्रत्येक चित्रपट फर्स्ट डे, फर्स्ट शो पाह्यचे, असंही या पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे.

बॉलिवूड आणि राजकारणी यांच्यातील अतूट नात्याच्या चर्चा आपण नेहमी ऐकतो. 90 च्या शतकातील प्रसिद्ध सिमी गरेवाल यांच्या एका टॉक शोमध्ये करिनाला प्रश्न विचारला की, तुझ्या आवडीच्या व्यक्तीचे नाव सांग, ज्याला तू डेट करशील? तेव्हा करिनाने हे नाव घेतलं होतं. ‘मी हे सांगू? मला नाही माहीत… सांगू की नको असा प्रश्न पडतो… हे मी बोलल्यास वाद होऊ शकेल… मात्र राहुल गांधी यांना मला डेट करायला आवडेल’, असं करिना उत्तर देताना म्हटली होती.

त्यानंतर करिनाला 2009 मध्ये पुन्हा एकदा त्यांच्या डेटबद्दल विचारले असता ती सिमी गरेवाल यांच्या कार्यक्रमात दिलेल्या उत्तरावर ठाम राहिली नाही. तसेच राहूल गांधी याच्या वैयक्तिक स्वभावाबद्दल तिला विचारले तेव्हा करिनाने ती खूप जुनी गोष्ट आहे, मात्र आमच्या घराण्याची आडनावे खूप प्रसिद्ध असल्याचे सांगितले. तसेच राहुल गांधी यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला प्रमुख पाहुणी म्हणून जाण्यास आवडेल आणि त्यांना पंतप्रधान पदावर पाहायला आवडेल असं करिनाने सांगितलं होतं, असंही या पुस्तकात म्हटलं आहे.

इंदिरा गांधी यांना राज कपूर यांची मोठी मुलगी ऋतूशी राजीव गांधी यांचा विवाह लावून द्यायचा होता, असं या पुस्तकात म्हटलं आहे. ‘बॉलिवूडशी संबंधित सून किंवा बॉलिवूडच्या झगमगाटाशी इंदिरा गांधी यांना काहीही घेणंदेणं नव्हतं. त्यांना राज कपूर यांच्याविषयी आदर होता. त्यामुळेच त्यांना कपूर घराण्याशी कौटुंबीक संबंध निर्माण करायचे होते. मात्र त्यांची ही इच्छा पूर्ण झाली नाही. राजीव गांधी ब्रिटनला गेले. तिकडे त्यांची सोनियांबरोबर भेट झाली आणि त्यांनी पुढे लग्न केलं’, असं या पुस्तकात म्हटलं आहे.