fbpx

हिंदी मिडीयमच्या सिक्वलमध्ये करीना कपूर साकारणार भूमिका

टीम महाराष्ट्र देशा : मार्च २०१८ मध्ये इरफान खानने एक ट्वीट केले होते. त्यामध्ये त्याने आपल्या आजाराविषयी सांगितले. आपण न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाच्या आजाराशी लढत असल्याचे सांगितले. त्यावरील उपचारासाठी तो देशाबाहेर गेला होता. जवळपास १ वर्ष लंडन मध्ये घालवल्या नंतर फेब्रुवारी मध्ये तो मायदेशी परतला आहे. गेल्या १ वर्षापासून तो सिनेमांपासून लांब होता. आता तो ‘इंग्लिश मिडीयम’ नावाच्या चित्रपटा सोबत पुन्हा परत येतोय असे सांगितले जात आहे.

२०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिंदी मिडीयम’ तो सीक्वल आहे. साकेत चौधरी दिग्दर्शित ‘हिंदी मिडीयम’ सिनेमाला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. बॉक्स ऑफिस वर हा सिनेमा सुपर डुपर हिट झाला होता. भारतीय शिक्षण व्यवस्थेवर आधारित हा सिनेमा होता. जवळपास ३०० कोटींच्या घरात या सिनेमाची कमाई झाली होती. या फिल्मचे बजेट २५ कोटी इतके होते. आता या फिल्मचा सिक्वल पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक असून यामध्ये इरफान खान च्या ओपोझीट करीना कपूर मुख्य भूमिकेत असणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच लंडन मध्ये सिनेमाचे चित्रीकरण केले जाईल.