मुंबई: स्टुडन्ट ऑफ द इयर 2 (Student of the Year 2) चित्रपटातद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी अनन्या पांडे (Ananya Pandey) हिने फार कमी वेळेतच बॉलीवूड Bollywood मध्ये आपला ठसा उमटवला आहे. अनन्याने बॉलीवूड मध्ये फारसा वेळ घालवला नाही पण तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकताच, अनन्या नदीचा 24 वा वाढदिवस साजरा केला आहे आणि त्या निमित्ताने इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र अनन्या तिच्या वाढदिवसा दिवशी स्वतःच्या वेगळ्याच झोन मध्ये दिसली आहे. अनन्या चक्क करीनाच्या कभी खुशी कभी गम या चित्रपटातील ‘पू’ (Pooh) पात्रामध्ये दिसली आहे. अनन्याचा हा लूक बघून बॉलीवूडची बेबो (Bebo) म्हणजेच करीना कपूर (kareena Kapoor) देखील तिची चाहती बनली आहे.
अनन्या पांडे (Ananya Pandey) चा ‘पू’ लुक
अनन्या पांडेचा कभी खुशी कभी गम या चित्रपटातील ‘पू’चा लुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनन्याने नुकताच तुझ्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ‘पू’चा सीन रिक्रेट करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने 2001 मध्ये आलेल्या कभी खुशी कभी गम या चित्रपटातील पूजा म्हणजेच ‘पू’ पात्रासारखा लुक केला आहे. यामध्ये तिने गुलाबी रंगाचे क्रॉप टॉप, मिनी स्कर्ट आणि गुलाबी जॅकेटसह स्कार्फ घेतला आहे. याबरोबरच अनन्याने ‘पू’चा डायलॉग सीन देखील रिक्रेट केला आहे. यामध्ये ती ‘पू’ प्रमाणे म्हणताना दिसली आहे, ” एवढा सुंदर दिसायचा तुला काहीच अधिकार नाही.” एवढेच नाही तर ती या व्हिडिओमध्ये ‘पू’ प्रमाणे चालताना आणि बोलताना दिसत आहे.
Ananya Pandey | अनन्या पांडेचा 'पू' अवतार बघून करीना कपूर झाली इम्प्रेसhttps://t.co/W2J8foQYtx
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) October 31, 2022
करीना कपूरची मोठी फॅन आहे अनन्या
यापूर्वीही अनन्या पांडे हिने अनेक मुलाखतीमध्ये ती बेबोची म्हणजेच करीना कपूरची खूप मोठी फॅन असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर ती अनेक मुलाखतींमध्ये म्हणाली आहे की, करीना कपूर ही तिची सर्वात आवडती अभिनेत्री आहे. अनन्याने केलेल्या या ‘पू’ च्या लुकचे करीना कपूर हिने कौतुक करत, अनन्या पांडेचा व्हिडिओ शेअर केला आहे.
‘पू’च्या लुकसह अनन्या झाली हॅलोवीन पार्टीमध्ये सामील
सध्या जगभरात हॅलोवीन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींसह भारतभर हा सण साजरा होताना दिसत आहे. अनन्या पांडे हिने हॅलोवीन पार्टीसाठी ‘पू’चा लुक क्रिकेट केला होता. अनन्य पांडेनी शेअर केलेल्या ‘पू’लुक मध्ये ती करीना कपूरप्रमाणे प्रिटी, हॉट आणि टेम्पटिंग ॲक्शन करताना दिसत आहे. अनन्याच्या या लुकची करीना कपूरने प्रशंसा केली असून अनेक सेलिब्रिटींनी देखील अनन्याच्या या लुकचे कौतुक केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! शरद पवारांची तब्येत बिघडली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- Bacchu kadu | रवी राणा अन् बच्चू कडू यांच्या वादाचा अद्यापही अंत नाही? राणांच्या दिलगिरी नंतर सुद्धा बच्चू कडू म्हणाले…
- Ravi Rana | बच्चू कडू यांनी देखील शब्द मागे घ्यावे – रवी राणा
- Jaya Bachchan | “नव्या बिना लग्नाची आई झाली तर….” ; आजी जया बच्चन यांचे वक्तव्य
- Ravi Rana | गुवाहाटीसंदर्भात बोललेले शब्द मागे घेतो ; रवी राणांचा घुमजाव