महाराष्ट्र देशा डेस्क : बेबो म्हणजेच बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विविध प्रश्नांची मनमोकळेपणाने आणि परखडपणे उत्तरं दिली आहेत. गेल्या वर्षी अशी बातमी आली होती की रामायणमधील सीतेची भूमिका करिनाला ऑफर करण्यात आली होती आणि तिने त्यासाठी 12 कोटी रुपये फी मागितली होती. यावर प्रतिक्रिया देताना करीना म्हणाली कि, तिला कधीही या भूमिकेची ऑफर देण्यात आली नव्हती.
करीनाने सांगितले की, “मला या चित्रपटाची ऑफर कधीच आली नाही, त्यामुळे मला या सगळ्यात का ओढले जात आहे, हे मला माहीत नाही. या चित्रपटासाठी माझी निवड कधीही करण्यात आली नव्हती. या सर्व लोकांनीच रचलेल्या गोष्टी आहेत. अफवा पसरवण्यासाठी दररोज लोक काहीतरी शोधत असतात. अशा बातम्या कुठून येतात हे मला माहित नाही. आजच्या काळात 100 मीडिया प्लॅटफॉर्म आहेत आणि त्यावरून बरेच काही सांगितले जाते, पण त्यामुळे आपण आपलं काम करायचं की या लोकांना स्पष्टीकरण देत राहायचं?”
सोशल मीडियावर कधी तरी होणारं ट्रोलिंग आणि कधी मिळणाऱ्या प्रेमाबद्दल करीना म्हणाली, “मी एक ब्रँड नाही. लोकांना मी आवडते कारण मी नेहमीच खरी राहण्याचा प्रयत्न करते. माझ्याकडे 5 एजन्सी, 4 पीआर करणारे लोक आणि 3 मॅनेजर नाहीत. जे मला सांगतील कि मला एखाद्या ठिकाणी मुलाखत द्यायला हवी किंवा आज काय पोस्ट करायचे यासाठी बसून काहीतरी प्लॅन करायला हवा. मी हे सर्व करू शकत नाही कारण माझ्याकडे दोन मुले, कुटुंब आणि मित्र आहेत. माझं सुद्धा एक आयुष्य आहे आणि माझ्याकडे हे सर्व करायला वेळ नाही.”
करिना ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये दिसणार
करीना कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर करीना या चित्रपटात रूपाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री मोना सिंग या चित्रपटात आमिरच्या आईची भूमिका असून अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Yashomati Thakur | महागाई आणि दडपशाही या मोदीनितीचा निषेध – ॲड. यशोमती ठाकूर
- Ranveer singh | न्यूड फोटोशूटनंतर रणवीरला आली एका अनोख्या शूटची ऑफर; ‘पेटा’ने पाठवले पत्र
- Navneet Rana and Ravi Rane | “ते प्रकरण हलक्यात घेत आहेत” ; राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्याची पोलिसांकडून मागणी
- Congress । काँग्रेसच्या देशव्यापी आंदोलनाचे महाराष्ट्रातही तीव्र पडसाद; नाना पटोलेंसह प्रमुख नेते पोलिसांच्या ताब्यात
- Congress | देशात लोकशाहीची हत्या, भाजपविरोधात राहुल गांधी आक्रमक! पोलिसांनी घेतले ताब्यात
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<