‘गे’पणावर करण जोहरचा मोठा खुलासा

मुंबई: बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी मंडळींबद्धल समज, गैरसमज आणि अफवा मोठ्या प्रमाणात पसरत असतात. त्याला बॉलिवूडची ही मंडळी आपापल्या परिने उत्तर किंवा खुलासा देत असतात. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर यानेही त्याच्याबद्धल होणाऱ्या चर्चेला आपल्या आत्मचरित्रातून खूलासा करत उत्तर दिले आहे. करण जोहर गे असल्याबद्धल अनेकदा दबक्या आवाजात चर्चा होते. मात्र, करणने पहिल्यांदाच त्याबाबत जाहीर भाष्य केले आहे. ‘द अनस्युटेबल बॉय’ या त्याच्या आत्मचरित्रात त्याने आजवर कधीही उल्लेख न केलेल्या अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे.

आपल्याबाबत होणाऱ्या चर्चेबद्धल काहीतरी खूलासा करत किंवा प्रत्युत्तर देत वेळ मारून नेण्याचा करण जोहरने प्रयत्न केला नाही. तर त्याने या गोष्टी थेट आपल्या आत्मचरित्रातच लिहील्या आहेत. त्यामुळे हे आत्मचरित्र जोरदार गाजले तर आश्चर्य वाटायला नको. करणने केवळ त्याच्या होमोसेक्सश्युल, बायोसेक्सश्युल असण्यावरच भाष्य केले नाही तर, सेक्स आणि त्या अनुशंघाने येणाऱ्या अनेक गोष्टींवर करण आपल्या आत्मचरित्रात बोलला आहे. दरम्यान, आजवर समोर न आलेल्या अनेक अनुभव आणि प्रसंगांची मेजवानीही करणने आपल्या आत्मचरित्रातून दिली आहे.

आपल्या आत्मचरित्रात करण लिहीतो, अनेक लोक माझ्या सेक्सलाईफबद्धल जाणून घेऊ इच्चितात. पण, अशा लोकांना मला काही ओरडून सांगायची मला मुळीच आवश्यकता नाही. कारण मला माहित आहे, मी एका असा देशात राहतो की जेथे मी काही गोष्टी सांगितल्यास मला तुरूंगाची हवा खावी लागू शकते. वयाच्या 26व्या वर्षीच माझी व्हर्जिनिटी गेली, हे सांगण्यात मला काही अभिमान वाटत नाही. हे सर्व न्यू यॉर्कमध्ये झालं होतं. त्या वेळेपर्यंत मला सेक्सबद्दल काहीच अनुभव नव्हता, असे तो प्रांजळपणे आपल्या आत्मचरित्रात म्हणतो.

करण आपल्या आत्मचरित्रात पूढे लिहीतो की, तेव्हा मी बराच लहान होतो. त्या काळात मला सेक्सबद्धल फारसं माहित नव्हतं. माझ्या वर्गातल्या एका मुलाने एकदा मला प्रश्न विचारला की, तुला ब्लो जॉब माहिती आहे का? त्यावेळी मी नाही असं उत्तर दिलं. मला ब्लो जॉब काय असते हे माहीत नव्हतं, मात्र मी त्याबद्दल ऐकलं होतं. त्यानंतर त्या मुलानं मला स्वतःचे कपडे काढण्यास सांगून पंख्याचा स्पीड वाढवला, यालाच ब्लो जॉब म्हणतात, असे तो म्हणाला. त्यानंतर मी असं तीनदा केलं. मात्र, मोठा झाल्यावर सेक्समध्ये फार काही अवघड नसल्याचे मला लक्षात आल्याचे करण जोहर आपल्या आत्मचरित्रात म्हणतो.

एक खास आठवण

आपल्या आत्मचरित्रात करणने एक आठवणही सांगितली आहे. हा काळ कुछ कुछ होता है चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरचा आहे. तो म्हणतो की, हा चित्रपट (कुछ कुछ होता है) प्रसिद्ध झाल्यावर माझा खऱ्या अर्थाने सेक्सशी सामना झाला. पण, मी माझ्याबद्धल अनेकदा सेक्सबाबत अनेक अफवा ऐकतो. काहींनी तर शाहरूख खान आणि माझ्यात संबंध असल्याच्या अफवा पसरवल्या. पण, यातली खरी गोष्ट अशी की, शाहरुख खानला मी माझ्या मोठ्या भावाप्रमाणे मानतो. त्या काळात आम्ही दोगे कोणत्या परिस्थीतीतून गेलो हे आम्हा दोघांनाच माहिती. मी होमोसेक्सश्युल, बायोसेक्सश्युल असलो तरी तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मला या विषयावर काहीही बोलायचं नाही. माझा जन्म सेक्स आयुष्यावर चर्चा करण्यासाठी झाला नाही, असेही त्याने आपल्या आत्मचरित्रात लिहीले आहे.