Share

Karan Johar | निपोटिझमच्या चर्चेला उधाण, ‘या’ स्टारकिडला करण जोहर देणार बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी

मुंबई : बॉलीवूडमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी निपोटिझम (Nepotism) हा मुद्दा प्रचंड चर्चेत होता. या मुद्द्यावरून निर्माता दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) यावर टीका करण्यात आली होती. धर्मा प्रोडक्शन (Dharma Production) च्या माध्यमातून करण जोहरने बॉलीवूडमध्ये अनेक स्टारकिड्स (Starkids) ला लाँच केले आहे. आता पुन्हा करण जोहर एका लोकप्रिय स्टारकिडला बॉलीवूडमध्ये पदार्पणाची संधी देणार आहे.

करण जोहर नेहमी कलाकारांच्या मुलांना चित्रपटात काम करण्याची संधी देतो. त्याचबरोबर तो स्टारकिड्स आणि बाहेरून आलेल्या कलाकारांमध्ये भेदभाव करतो. इतर कलाकारांना संधी न देता तो बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलांना संधी देतो. अशा प्रकारच्या टीकांना करण जोहरला सामोरे जावे लागत होते. या सगळ्यांवरून मध्यंतरी मोठा वाद देखील निर्माण झाला होता. दरम्यान, करण जोहर आता पुन्हा एकदा एका प्रसिद्ध स्टारकिडला त्याच्या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमधील लाँच करण्याची माहिती समोर आली आहे.

बॉलीवूड सुपरस्टार सैफ अली खान (Saif Ali Khan) चा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) याला करण जोहर बॉलीवूडमध्ये लाँच करणार आहे. इब्राहिम अली खान हा बॉलीवूडमधील एक लोकप्रिय स्टारकिड आहे. त्यामुळे तो नेहमी चर्चेचा विषय असतो. वडील सैफ अली खान आणि बहीण सारा अली खान यांच्याप्रमाणे चाहते इब्राहिम बद्दलही माहिती जाणून घेण्यास नेहमी उत्सुक असतात. इब्राहिम मोठ्या पडद्यावर आपली छाप पाडण्यासाठी सुसज्ज झाला असून, करण जोहर लवकरच त्याला बॉलीवूडमध्ये लाँच करणार आहे.

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून इब्राहिम अली खानने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या करण जोहरच्या आगामी चित्रपटासाठी इब्राहिमने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. या चित्रपटानंतर इब्राहिम पहिल्यांदाच अभिनय करताना दिसणार आहे. बोमन इराणी यांचा मुलगा कायोझ इराणी दिग्दर्शित आगामी चित्रपटामध्ये इब्राहिम अली खान दिसणार आहे.

कायोझ इराणी दिग्दर्शक हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या माध्यमातून निर्मित केला जाणार आहे. अद्याप या चित्रपटाचे नाव निश्चित झालेले नाही. दरम्यान, हा चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहांमध्ये येणार आहे असंही समोर आलं आहे. सारा अली खान हिने बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाने एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. आपल्या बहिणीप्रमाणे इब्राहिम अली खान बॉलीवूडमध्ये आणि चाहत्यांच्या मनामध्ये आपली छाप पाडू शकेल का हे बघण्यासाठी प्रत्येक जण आतुर आहे.

महत्वाच्या बातम्या 

मुंबई : बॉलीवूडमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी निपोटिझम (Nepotism) हा मुद्दा प्रचंड चर्चेत होता. या मुद्द्यावरून निर्माता दिग्दर्शक करण जोहर (Karan …

पुढे वाचा

Entertainment

Join WhatsApp

Join Now