कारंब्यातील गणवेश जगभरात ओळख मिळवतील : सुभाष देशमुख

सोलापूर : कारंब्यातील महिलांना घरबसल्या शालेय गणवेश, टाय, बेल्ट यासारखे कपडे शिलाई करण्याचा रोजगार मिळाला आहे. आपल्यातील कार्यकुशलतेच्या जोरावर महिला नक्कीच गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार कामकरतील आणि हे कपडे स्थानिकच नव्हे तर जगभरातील मार्केटमध्ये ओळख मिळवतील, असा विश्वास  माजी सहकारमंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.

कारंबा (ता.उत्तर सोलापूर) येथे सोलापूर सोशल फाउंडेशन आणि कमल लघु उद्योगाच्या पुढाकाराने आणि कारंबा ग्रामपंचायतीच्या सहाय्याने महिलांना घरच्या घरी रोजगार देणार्या गारमेंट प्रकल्पाचे उदघाटन आ. देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते.

Loading...

अध्यक्षस्थानी सरपंच कौशल्या सुतार होत्या. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, असोसिएट गारमेंट क्लस्टरचे चेअरमन जितेंद्र डाकलिया, सहासचिव प्रकाश पवार, संचालक अमित जैन, कमल उद्योगाचे जयसिंग पवार, प्रा. विनायक सुतार आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, महिलांमध्ये मूळातच अंगभूत कौशल्य असते, विशेषतः कामाच्याप्रती निष्ठा आणि त्याग अधिक असतो. आपल्या घराला आपला आर्थिक हातभार लागावा, यासाठीच त्यांची ही धडपड असते. याच धडपडीला बळ देण्याचे कामहा प्रकल्प करेल. पण आजचे जग मार्केटिंग आणि ब्रँडीगचे आहे. त्यासाठी आपली, आपल्या गावाची ओळख वाढवा.फौंडेशनच्या माध्यमातून त्यांनी हवी ती मदत केली जाईल. डाकलिया यांनी भविष्यात कारंब्यासह परिसरातील गावातील महिलांनाही सामावून घेऊ, असे आश्वासन दिले.

प्रास्ताविकात विनायक सुतार यांनी या उद्योगामागचा उद्देश सांगितला. यावेळी माजी सरपंच मल्लिनाथ तंबाके, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब गुंड, विश्वनाथ जगताप, ग्रामपंचायत सदस्य इन्नुस शेख, श्रीकांत आदाटे, अशोक बहिर्जे, सौ. स्मिता पाटील, सौ. लक्ष्मी बहिर्जे, सौ. कविता भोरे, भागवत कत्ते, महेश पेंडपाले, संजय आदाटे, आनंद सुतार, शशिकांत दुधाळ, अकबर पटेल, सत्तारभाई शेख आदी उपस्थित होते

शंभराहून आधिक महिलांना मिळणार रोजगार

कमल लघु उद्योग या प्रकल्पाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश, टाय, बेल्ट, बो तयार करणे आदी शिलाईची कामे गावातील महिलांना घरच्या घरी देऊन रोजगार दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात गावातील सुमारे शंभराहून आधिक महिलांना हा रोजगार मिळणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश