दहिगाव उपसा सिंचन विशेष आवर्तन सुरु

करमाळा : मतदार संघाचे आमदार नारायण (आबा ) पाटील यांचे नेतृत्वाखाली कार्यान्वित रोजी दुपारी ठिक वाजता दहिगाव पंपगृह येथुन पाणी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. आमदार नारायण ( आबा) पाटील यांचे आदेश व सुचना नुसार हे आवर्तन आजपासुन चालू राहणार आहे. उद्या कुंभेज येथील टप्पा 2 मधुन पुर्व भागातील कालवा व पोटचारी मधे पाणी वितरित होणार आहे.

आ.नारायण (आबा) पाटील यांनी दिलेल्या सुचनांनुसार या प्रकल्प अंतर्गत तलाव, बंधारे आदिसह पाणी साठवण क्षेत्र भरून घेतले जाणार आहे. तरी शेतकरी व प्रकल्पग्रस्तांनी पाण्याचा लाभ घेताना सहकार्य करावे. सदर पाणी आवर्तन हे आ.नारायण (आबा) पाटील यांचे आदेशानुसार कमीत कमी 21 दिवस चालणार असुन आगामी काळात पाऊसाचे प्रमाण पाहुन पाणी वाटप नियोजनात बदल होऊ शकतो. तरी सर्वांनी सहकार्य करत पाण्याचा लाभ घेन्याचे आवाहन करण्यात आले आहे.

bagdure

आमदारकीसाठी काहीही…माढ्याचे संजय शिंदे होणार ‘करमाळा’कर

You might also like
Comments
Loading...